Saturday, August 23, 2014

आई-वडील

लहानपणी नव्हती ओळख अस्तित्वाची आपणास,
हरवून गेलो होतो खेळ-खेळणींच्या नादात... 

तेव्हा तर स्वतःची ओळखही स्वतः करता येत नव्हती...
ओळख करून देणार असे कुणी नाही आई नि बाबाच होती...

त्यांनी आपल्यासाठी केलेली कार्ये ती जगावेगळीच...
फेडता फिटणार नाही ऋण त्यांचे कुठलेही कधीच...

प्रेमाला त्यांच्या समजुन घ्यायला हवे,
त्यांनीच तर दिले होते आपणास तत्त्व नवे...

जबाबदारी आल्यावर त्यांची का बरेचजण तोंड फिरवतात?
आदर सत्कार तर सोडा, नीट बोलणच विसरतात....

आहात कृतज्ञ त्यांच्याबद्दल तर आहे बरे...
त्यांची तिच अपेक्षा असते हे खरे...

आपल्या आनंदातच तर आनंद लपलेला असतो त्यांचा... 
म्हणूनच प्रत्येकाला असावा अभिमान आपल्या आई-वडिलांचा...                                                                                           
-वेदांती

आई-वडील

आई-वडील

सारांश रुपात :
In summary form:

We didn't know who we were when we were small. We were just lost in games and toys. We couldn't even introduce ourselves to anyone. Our parents were only there who helped us in every way. They have taught us great things. We can never repay our parents. We should understand their love. They have given us many principles. Many of us refuse to take their responsibility. Many of us don't respect & even dislike to talk to them but we have to be grateful for them. This is the only thing they want. Their Happiness is just in ours. So everyone should be proud of their parents.